
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा- शाम पुणेकर.
पुणे –तज्ञ समितीच्या मते महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सुमारे १५ ते २० टीपी स्किम (नवीन नगर योजना) राबविता येऊ शकतात. त्या अनुषंगाने महापालिकेकडून नियोजन सुरू करण्यात आले असून, या गावांच्या नियोजनबद्ध विकासासाठी याचा फायदा होणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेच्या एकात्मिक विकास आराखड्यात खासगी टीपी स्किम राबविण्याची तरतूद असून, त्यानुसार,५० एकरपेक्षा जागेत हे शक्य आहे. या तरतुदीचाही वापर करण्याचे प्रशासनाकडून सुरू आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेने आतापर्यंत केवळ ८ टीपी स्किम केल्या आहेत. त्यानंतर महापालिकेत नवीन समाविष्ट झालेल्या काही गावांमध्ये नव्याने तीन टीपी स्किम प्रस्तावित केल्या असून, त्यातील दोन योजना राज्य शासनाच्या मान्यतेच्या अंतिम टप्प्यात आहेत.
यामध्ये नियोजनाबद्ध कामे होणार असल्याने तसेच जागा मालकांनाही फायदा होत असल्याने त्या सहज राबविणे शक्य होत आहे. त्यामुळे घरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. – न्यूज नेटवर्क