
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर :
संभाजी ब्रिगेड देगलुर-बिलोली विधानसभा अध्यक्ष पदी ॲड.अंकुशराजे जाधव यांची निवड संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संभाजी ब्रिगेड नेहमीच शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, निराधारांच्या तसेच विविध विषयांवर आक्रमक पणे बाजु मांडत असते सत्ताधारी व विरोधक सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजु झाल्यासारखे वागत आहेत.मराठा आरक्षणाचा विषय असो की शेतकर्यांच्या मालाला हमीभाव जाहीर कलण्याचा विषय असो या विषयावर सरकार अपयशी ठरले आहे.संभाजी ब्रिगेड महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असताना प्रबोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसोबतच विविध उद्योग सुरू करा,जातिय तेढ कमी होण्याबाबतीत जनजागृती केली.देगलुर तालुक्यात अनेक कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडच्या विचारावर चालणारी आहेत.ब्रिगेडचे कार्य आणखी जोमाने वाढण्यासाठी नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष ॲड अंकुशराजे जाधव यशस्वी होतील असे मत संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी देगलुर येथील आढावा बैठकप्रसंगी आपले मत व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैकीसाठी संभाजी ब्रिगेड लोकसभा उपाध्यक्ष दिलीप सुगावे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल थडके, जिल्हा संघटक बालाजी जाधव, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष गजानन जाधव मुजळगेकर, संभाजी ब्रिगेड बिदर जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील यांच्या उपस्थितीत देगलुर विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली.या बैठकीत डॉ सचिन जाधव यांची शहर उपाध्यक्ष, शिवकुमार फुलारी यांची तालुका संघटक,संजय निवळे यांची तालुका कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.यावेळी संभाजी ब्रिगेड देगलुर तालुकाध्यक्ष जेजेराव शिंदे,दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष पांडुरंग पाटील, उमाकांत भुताळे, देविदास थडके ,संतोष चिद्रावार .माधव खुनेवाड.शरद खानापूरे, संतोष माने, सदाशिव पाटील,बालाजी येडुरकर,प्रवीण कुडले,श्रीरंग डोंगळे, बालाजी जबडे यांच्या सहअसंख्य कार्यक्रते उपस्थित होते.