
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
दहिवडी माण तालुक्यांतील म्हसवड पोलीस ठाण्यांचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यांमध्ये गेले दीड वर्षापासून म्हसवड पोलीस स्टेशनचे कामकाज पाहिले तरुण आणि तडफदार शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची पोलीस खात्यांमध्ये चांगलीच ओळख होती. त्यांच्या कालावधीमध्ये म्हसवड पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनेक गुन्हे उघडकीस आणले. माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांच्या आदेशावरुन श्री.ढेकळे साहेबांची जिल्हा गुन्हे शाखेत बदली करण्यांत आली. तर त्यांच्या जागी म्हसवड पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार भुजबळ यांना पदभार घेण्यांचा आदेश माननीय पोलीस अधीक्षकांनी जारी करण्यांत आल्यांने श्री. राजकुमार भुजबळ साहेब म्हसवड पोलीस ठाण्यांत हजर राहून आपला पदभार स्वीकारला. त्यांनी यापूर्वी दहिवडी,शिरवळ अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्यदक्ष उल्लेखनीय सेवा बजावली आहे.श्री.राजकुमार भुजबळ हे मुळचे पुणे जिल्ह्यांतील असून श्री. भुजबळ साहेब हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची पोलीस प्रशासनीय विभागांत ओळख आहे.श्री. राजकुमार भुजबळ यांची म्हसवड पोलीस ठाण्यांत बदली झाल्यांचे सातारा जिल्ह्यांच्या पत्रकार श्री. गोसावी यांना समजली. त्यांनी श्री.भुजबळ साहेबांचे दूरध्वनीच्या माध्यमांतून साहेबांचे अभिनंदन करुन श्री. भुजबळ साहेबांना शुभेच्छा दिल्या. माण तालुक्यांतील म्हसवड पोलीस ठाण्यांचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून श्री. राजकुमार भुजबळ साहेब यांना माण तालुक्यांत सेवा बजाविण्यांचा दुसऱ्यांदा मान मिळाला.