
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
राजुरा
अवघ्या काही दिवसातच येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे या उत्सवाची रूपरेषा ठरविण्यासाठी तसेच शांतता राखण्यासाठी पोलीस विभागाचे वतीने तहसील कार्यालय सभागृह राजुरा येथे तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारला पोलीस हद्दीतील गणेश मंडळे व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती
राजुरासह ग्रामीण भागातील गावामध्ये गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो मात्र, मागील दोन वर्ष कोरोनासारखे जगातील संकट उभे राहिल्याने उत्सव अतिशय साध्या पध्दतीने पार पडले होते परंतु आता कोरून काळातील सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी मात्र, शासनाकडून अद्यापही कुठलीच मार्गदर्शक सूचना प्रशासनाला प्राप्त झाली नाही यावर्षी गणेश उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे त्यासाठी ग्रामीण भागातील मंडळांनी तहसील कार्यालयातुन तर शहरी भागातील मंडळाने नगर परिषद येथून परवानगी घ्यावी व कुठलेही आक्षेपार्ह फोटो बॅनर लावू अथवा देखावा तयार करू नये असे यावेळी तहसीलदार गाडे यांनी सूचना केल्या त्यामुळे गणेशोत्सवाचे काळात कोणताही अनुसूचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस व महसूल प्रशासन आतापासूनच सज्ज असून नुकतीच राजुरा तहसील कार्यालयात गणेश मंडळाची बैठक पार पडली आहे
दरम्यान यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत साखरे,नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, नगर परिषद अधिकारी विजय जांभुलकर,उमाकांत धोटे,अनिल बाळाश्रॉप,बंडू वनकर,संतोष कुडमथे,संतोष मेश्राम,जितेंद्र जीवने, आकाश गेडाम, प्रमोद कुमरे, अभिलाष परचाके, राहुल पाचारे,
आदींसह गणेश मंडळाचे पदाधिकारी व शांतता कमिटीचे सदस्य,पोलीस पाटील उपस्थित होते