रायगड : विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी या विषयाची भीती कमी व्हावी व त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून नुकताच रायगड जिल्ह्यातील उत्कुळ या जि.प.शाळेतील ६वी व ७वी च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक व लर्न टू एन्जाॅय या इंग्लिश पुस्तकाचे लेखक सुहास पटवर्धन यांनी इंग्रजी विषयाचे हसत खेळत मार्गदर्शन केले.सेवानिवृत्त प्राध्यापक सुहास पटवर्धन हे महाराष्ट्रातील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना स्वेच्छेने भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती कमी व्हावी व त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून मार्गदर्शन करत असतात.याप्रसंगी सेवानिवृत्त प्राध्यापक सुहास पटवर्धन यांनी उत्कुळ शाळेतील विद्यार्थ्यांना केलेल्या शैक्षणिक योगदानाबद्दल शाळेतील शिक्षकांनी आभार मानले व पुढील शैक्षणिक मार्गदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.