
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूरः
येथील गटसाधन केन्द्र पंचायतसमिती देगलूर यांच्यातर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शन व विज्ञान नाट्य महोत्सव घेण्यात आले नाट्योत्सवात सादर केलेल्या महामारी व सामाजिक समस्येवर आधारीत नाटकानी रंगत आणली.
□येथील ज्ञान सरस्वती इग्लींश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयात दि २४रोजी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे व विज्ञान नाट्य महोत्सवचे आयोजन केले गेले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले. प्रारंभी दिपप्रज्वलन व स्वागत गीतानतंर नाट्योत्सव व विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ झाला.
यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी राजकुमार जाधवर संस्थेचे सचिव माणिकराव जोशी. प्राचार्या वैदही पागेकर;राजाराम पागेकर , शिक्षण विस्तार अधिकारी मणियार, सूर्यवंशी केंद्रप्रमुख किसवे सर , देगलूर महाविद्यालयातील परिक्षक प्रा महेश कुलकर्णी , प्रा दत्ता पाटील , वै.धुंडामहाराज महाविद्यालयाचे प्रा चाकूरकर आर आर होते.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक स्तरावर ८६ माध्यमिक स्तरावर ५६. शिक्षक गटातून 1 तर नाट्योत्सवात अकरा समूहाने भाग घेतला. देगलूर तालुक्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता . यास्पर्धेचा निकाल नाट्यस्पर्धेत नरंगल च्या म.बसवेश्वर विद्यालयाने प्रथम ; साधना हायस्कूल देगलूरगटाने द्वितीयक्रमांक पटकाविला.
□विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक स्तरातून प्रथम सप्तगिरी पोद्दार लर्न स्कूल ;द्वितीय साधना हायस्कूल तर तृतीय क्रमांक भक्तापूर च्या जि.प.च्या विद्यार्थ्यानी पटकाविला. □माध्यमिक गटात प्रथम साधना हायस्कूल; द्वितीय सरस्वती विद्यालयम इंग्लिश स्कुल ; तृतीय क्रमांक सप्तगिरी पोद्दार लर्न स्कूल ने मिळविले आहे.
□ शिक्षक गटातून ज्ञानसरस्वतीच्या शिक्षकांना मिळाले आहे .
या प्रदर्शनाला तालुक्यातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.ज्ञानसरस्वती शाळेने या प्रदर्शनाचे आयोजन नेटक्या प्रकारे करून नावलौकिक मिळविला.
यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण बोयावार यांनी केले
प्रदर्शन यशस्वितेसाठी गटसाधन कार्यालयातील कर्मचारी पांचारे,साधनव्यक्ती पडलवार ;जाधव तसेच ज्ञान सरस्वती शाळेतील कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले. कोरोना कालावधीनतंर झालेल्या या प्रदर्शनास पाहण्यासाठी परिसरातील शालेय विद्यार्थ्यानी गर्दी केली होती.