
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
कंधार मतदार संघाचे माजी आमदार यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात सलग ३० वर्ष आमदार म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला विधानसभा सभागृह गाजवून ठेवले आता त्यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्यामुळे महाराष्ट्रचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्य विधिमंडळात त्यांचा मुंबई येथे गौरव करण्यात आला व मुंबईहून आज दिनांक २६ रोजी नांदेड ला पोहचले व ते नांदेडहून ते कंधार कडे लोहा शहरातून जात असताना लोहा शहरात त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला.
यावेळी लोहा येथे लोहा न.पा. चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वतीने माजी आ. भाई केशवराव धोंडगे यांचा लोहा शहरांच्या परंपरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून त्यांचे भव्य स्वागत केले.
यावेळी नगरसेवक करीम भाई शेख नगरसेवक संदीप भाऊ दमकोडवार नगरसेवक नबी शेख नगरसेवक नारायण येलरवाड संजय पाटील चव्हाण केतन खिल्लारे ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष केशव पाटील पवार पत्रकार बाळासाहेब कतुरे लकी फुलोरे विनोद चंदेवाड आधी उपस्थित होते.