
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरात सर्जा राजा चा बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून देऊळगल्ली येथे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी बैलांची पूजा करून शुभेच्छा दिल्या.
जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा व त्याला मोलाची साथ देणारा शेतीच्या मशागतीची अनेक कामे करणारा सर्जा राजा यांचा गुणगौरव करण्याचा त्यांचे लग्न लावण्याचा पुजा करण्याचा त्याला पुरणपोळी चारण्याचा महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा हा सण असुन तो लोहा शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
लोहा येथील मोठे जमिन जायजाद शेती असणारे शेतकरी तथा लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी त्यांच्या देऊळगल्ली येथील त्यांच्या चिरेबंदी वाड्यावर त्यांच्या बैलाची पुजा करुन बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित सहकुटुंब सहभागी झाले होते देऊळगली येथील सर्व नागरीक या सोहळ्याला उपस्थित होते हा बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.