
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कंधार- बाजीराव गायकवाड
कंधार:- दि.२३ आॅगस्ट रोजी पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये खालील प्रवास सवलत अनुज्ञेय करण्यास
शासनाची मान्यता देण्यात आली आहे.१)७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास अनुज्ञेय राहील.२)६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५०% प्रवास अनुज्ञेय राहील.तरी कंधार तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे रा.प.महामंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.