
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
कोरोनाच्या 2 वर्षांच्या निर्बंधनानंतर यंदा मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक राहिलेत. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी शेवटच्या टप्प्यात आलीय. मुंबईतही मानाच्या गणपतींचं आगनम सोहळेही पार पडतायेत. यातच आता मोठी बातमी समोर आली आहे.
गणपतीत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने एकूण 5 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. पत्राद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गणेशोत्सवात सुट्टी मिळावी, अशी मागणी मनसे आणि अनेक विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती..
या सर्वाची दखल घेत शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलाय. तसेच या 5 दिवसांच्या सुट्टीदरम्यान कोणत्याही लेखी किंवा तोंडी परीक्षेचं आयोजन करु नयेत, असं आवाहनही करण्यात आलंय. तसेच पालक वर्गाची काही तक्रार येणार नाही, याबाबतही काळजी घेण्याचे आदेश या पत्राद्वारे केलं गेलंय.