दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनिधी-
भीमक्रांती सोशल फौंडेशन हरोली.ता.शिरोळ आयोजित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
इंगळी येथील प्रसिद्घ साहित्यिक,सामाजिक कार्यकर्ते कवि सरकार इंगळी यांना साहित्य सम्राट काव्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सदरचा पुरस्कार माजी आमदार मदनलाला दिंगबर कुलकर्णी जालना यांचे हस्ते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते सागर शंभुशेटे यांचे उपस्थीत देणेत आला.या कार्यक्रमाचे उद्धाटन शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री.अमरसिंह पाटील यांचे हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपसभापती संजय माने यांनी भूषवले. दिंगबर कुलकर्णी माजी आमदार जालना यांनी मार्गदर्शन केले.प्रमुख. उपस्थिती श्री.रमेशजी शिंदे,संजय गांधी योजना कमिटी सदस्य , विकास पाटील ,कुणाल सत्यद्रराजे सरपंच यड्राव बाबासो नदाफ,यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार,सिने अभिनेते दगडू मांने व राजेंद्र प्रधान एकपात्री नाट्य यांनी केले. कार्यक्रमात गजलकार सिराज शिकलगार कवि मधूकर हुजरे,वृषाली होगाडे,सुवर्णा पवार,कवि अशोक पवार,यांनाही गौरवण्यात आले. डा.अनिता खेबूडकर मिरज,कवि सात्ताप्पा सुतार,डा,लक्ष्मण हेंबाडे मंगळवेढा.व अनेक मान्यवर उपस्थीत होते.
भीमक्रांती सोशल फौंडेशनच्या माध्यमातून अनेक कलाकार,साहित्यकार,साहाजिक,शिक्षण,शिक्षक,राजकिय नेते,उधोजक,अशा विविध क्षेत्रातील कर्तव्यनिष्ठ ,नामवंताना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असते.स्वागत व आभार भीमक्रांती सोशल फौंडेशनचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बाळासाहेब कांबळे व त्यांचे सर्व सहकारी सदस्य ,तसेच फोटोग्राफी शिवाजी यडवान हे होते.
