
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नागपूर – केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी गेल्या काही दिवसांपासून बरेच चर्चेत आहेत. केंद्रीय संसदीय मंडळातून त्यांना काढून टाकल्यानंतर ते जास्तच आक्रमक झाले आहेत.
त्यामुळे येत्या काळात ते निवडणूक लढवतील की नाही याबाबत साशंकता आहे. तसेच, ते भाजपाला अनेक उपरोधिक टीकाही लगावत आहेत. दरम्यान, त्यांनी नागपुरातही एक उपहासात्मक टोला लगावला आहे. उगवत्या सूर्यालाच नमस्कार करायचा नसतो, तर बुडत्या सूर्याच्याही पाया पडायचं असतं असं नितीन गडकरी म्हणाले. ते उद्योजकांना संबोधून भाषण करत होते.
नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी उद्योजकांनाही कानमंत्र दिला आहे. त्यांनी रिचर्ड निक्सन यांचा संदर्भ देत सांगितलं की, एखाद्या व्यक्तीचा अंत तेव्हा होत नाही जेव्हा तो हरतो, पण जेव्हा काम करणं सोडत नाही तेव्हा त्याचा अंत होतो. कोणताही व्यवसाय, सामाजिक कार्य किंवा राजकारणात लोकसंपर्क असणे गरजेचं आहे. लोकसंपर्क हीच मोठी ताकद आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले की, कोणाचाही वापर करून त्यांना फेकून देणं चांगलं नाही. दिवस चांगले असो वा वाईट, जर एखाद्याचा हात पकडला तर सोडायचा नसतो, असा सल्लाही त्यांनी दिला. फक्त उगवत्या सूर्याची पूजा करायीच नसते. तर, बुडणाऱ्या सूर्याच्याही पाया पडायचं असतं, असंही ते म्हणाले होते.
जेव्हा मी विद्यार्थी नेता होतो, तेव्हा काँग्रेस नेता श्रीकांत जिचकर यांनी मला काँग्रेसमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की, मी विहिरीत जाऊन जीव देईन पण काँग्रेसमध्ये येणार नाही. कारण, काँग्रेस पक्षाची विचारधारा मला आवडत नाही.