दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : पुरातन काळातील विविध नाणी व निरनिराळ्या मान्यवरांसह राजमान्यता प्राप्त प्राचिन टपाल तिकीटांपासून बोध घेण्यासारख्या ब-याच गोष्टी साध्य करता येतात. शूर वीर पुरुषांच्या शौर्य कथाही अगाध ज्ञानाचं भांडार ठरल्या जातात. अशाप्रकारच्या पुरातन वस्तूंचं संवर्धन करणे ही काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी त्यासाठी सदैव कार्यरत राहिलं पाहिजे असे प्रबोधन प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केलं.
परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने आयोजित पुरातन वस्तू व टपाल तिकीटाच्या प्रदर्शन समयी उद्घाटन केलं त्यावेळी प्राचार्य डॉ. जाधव बोलत होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्ताने आयोजित या भव्य अशा प्रदर्शनात सन १९४७ सालापासूनची पुरातन व निजामकालीन नाणी, संत, महंत व शूर वीर पुरुषांच्या प्राचिन टपाल तिकीटांचे संकलन धनंजय मुलगीर यांनी केले आहे. नाते व टपाल तिकीटांच्या संकलनासाठी धनंजय मुलगीर यांच्या अंगी असलेली जिद्द, चिकाटी व मेहनतीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. विद्यार्थ्यांनी ती वृत्ती अंगिकारणे त्यांच्या हिताचे व कौशल्याचे परिमार्जन केल्यासारखेच होईल, असे कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे.
