
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -कवि सरकार इंगळी
दिनांक . 28/8/2022 रोजी हा कार्यक्रम डोंबिवली येथे घेण्यात आला . व्यक्ती कुठल्याही क्षेत्रातील असो, तिला यश संपादन करण्यासाठी प्रतिभा असावीच लागते . त्यासाठी डोळ्यासमोर उच्च आदर्शवाद ठेवल्यास त्या प्रकटीकरणातून अजरामर निर्मिती ही घडू शकते असे प्रतिपादन पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्व महात्मा सर डॉ . मधुसूदन घाणेकर यांनी केले . आम्रपाली धेंडे या सतत प्रयत्नशील आहेत . त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय छान आहे . असे त्यांनी सर्वांसमोर आपले मत व्यक्त केले . मधुसूदन घाणेकर सरांनी सुंदर विचारांचे मनोगत व्यक्त करून रसिकांची मने जिंकली . त्याचप्रमाणे डॉक्टर प्राची बामणे यांनी सर्वोत्कृष्ट असे सूत्रसंचालन केले प्रारंभी प्राजक्ता नठाळे यांनी ईश्वरस्तवन केले . प्राध्यापक नागेश्वर हुलावळे यांना हास्यविद्यावाचस्पती उपाधिने तर तबला वादक रवी पोक्षे यांना साहित्य कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला . प्रतिमा काळे यांनी आभार मानले . वर्ल्ड व्हिजन संस्थेच्या सामाजिक कार्यात एकरूप झालेल्या हुलावळे कुटुंबाचा डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी विशेष गौरव केला. ज्येष्ठ चित्रपट अभ्यासात प्रकाशक चांदे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते आम्रपाली धेंडे यांचे सर्व स्तरातून कौतुक त्याचप्रमाणे अभिनंदन होत आहे .