
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी-
===================
बलात्काऱ्यांना संरक्षण हेच का , मोदींचे महिला धोरण ?*
बिल्कीस बानो प्रकरणातील गुन्हेगारांची माफी रद्द करून त्यांना तुरूंगात टाका तसेच राजस्थान ,सुराणा येथील इंद्र मेघवाल या मुलाची हत्या करणाऱ्या शिक्षकावर खटला जलदगती न्यायालयांमध्ये चालवा या मागणीसाठी रविवारी अपना वतन संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथील आंबेडकर पुतळा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुट्टपी वृत्तीचा निषेध करण्यात आला . १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या सुरक्षेविषयी ,हक्कांविषयी बोलले , परंतु त्याच दिवशी गुजरात मधील बिल्किस बानो प्रकरणात गुन्हेगार असलेल्या आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने व गुजरात घेतला. हा देशातील सर्व स्त्रियांचा अवमान आहे. अशी भूमिका मान्यवरांनी मांडली. तसेच राजस्थान मधील सुराणा गावामध्ये ९ वर्षाच्या बालकाला निष्ठुरपणे मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली . या दोन्ही घटना लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या आहेत. त्यामुळे बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींची माफी रद्द करून त्यांना तुरुंगात टाका , व इंद्रनील खटला जलदगतीने चालवावा अशी मागणी अनेक मान्यवरांनी केली.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे , मारुती भापकर ,सुरेश बेरी , संजय बनसोडे , जमियत उलेमाये हिंद चे हाजी गुलजार शेख , मौलाना इस्लामउद्दीन , मदनी फाउंडेशन चे मौलाना अलीम अन्सारी , संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे , संविधान बचाव संघर्ष समितीचे झाकीर शेख , फिरोज मुल्ला ,ऍड फारुख शेख , सलीम शेख , शोएब काझी , साद गाझी ,रफिक कुरेशी ,राजश्री शिरवळकर ,कामरुनिसा शेख ,रुहीनाज शेख , समरीन कुरेशी , नसीब खान , रुबिना शेख , गणेश जगताप ,दीपक खैरनार ,राम चिंतले ,प्रकाश पाठारे , नीरज कडू ,अब्दुल अजीज शेख , तौफिक पठाण ,हाजीमलंग शेख ,प्रकाश घोडके* यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.