
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
केन स्टार अकॅडमी सेलू येथे केन स्टार किड्स इंग्लिश स्कूल येथे मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त शाळेत क्रीडा दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम हॉकी चे जादूगार म्हणून ओलखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे संचालक प्रिंसीपल श्रीराम रेंगे व संचालक कृष्णा गीते यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा दिनाचे औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, दोरीवरच्या उड्या, तळ्यात मळ्यात आदी खेळ घेण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षिका भारती इंगोले, अनुसया वाघमारे, जया माने, प्रतीक्षा थेटे, आशा काळे, शिक्षक मुंजाभाऊ शिंदे आदी उपस्थित होते.