दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ जयंतीनिमित्त माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांनी प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.
त्यावेळी बाभुळगाव मधील कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, बाभुळगाव मधील युवकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा केलेली जयंती म्हणजे अण्णाभाऊ साठे यांना अपेक्षित जयंती साजरी केली.
अण्णाभाऊनी ज्या पद्धतीने विविध जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन “”लालबावटा”” कला पथकाच्या मार्फत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली. त्याचप्रमाणे बाभुळगाव मधील युवकांनी विविध जाती धर्मातील तरुणांनी एकत्र येऊन केलेली आजची जयंती अण्णा भाऊंना खरी आदरांजली ठरेल.
प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना आपल्या समाजाचा विकास करायचा आहे. विकास करताना कुठल्याही जाती धर्माबद्दल वाईट बोलायचं नाही. लोकशाहीची सर्व तत्वे पाळून, सर्वधर्म स्वभावाने आपल्या जाती समाजाचा विकास करणे गरजेचे आहे. यावेळी बागवे साहेबांनी मातंग समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे व शिक्षणाचा भाव असल्याचे सांगितले. जर या परिस्थितीवर मात करायची असेल तर आमच्या समाजाने संघटित होऊन शिक्षण व व्यवसाय यामध्ये प्रगती करणे गरजेचे आहे.
जर समाज संघटित असेल, एका झेंड्याखाली एकत्र आला तर या देशातील व महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष सुद्धा आपल्याला स्वतःहून बोलून, समाजाला आपल्यासोबत येण्याची मागणी करतील आणि राजकीय दृष्टीने सुद्धा आपल्याला अपेक्षित असणाऱ्या सर्व राजकीय चर्चा होतील पण त्यासाठी आपल्या समाजातील जे वेगवेगळे पक्ष, संघटना आहेत. या सर्वांनी एकाच झेंड्याखाली एकत्र येण्याची, एकसंघ होण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जेवढी आपल्या समाजाची लोकसंख्या त्या लोकसंख्येच्या आधारावर आपल्याला भागीदारी मिळाली पाहिजे अशी असे प्रतिपादन त्यांनी केले. देशातील सर्वात प्रामाणिक जात ही मांगाची आहे त्यासाठी शासकीय दरबारातील योजना मांगाच्या दारी येणे गरजेचे आहे हे शक्य करायचं असेल तर मातंग समाजाला एकसंघ होऊन काम करणे गरजेचे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार त्यांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराच्या मागणीनुसार गेल्या अनेक वर्षांच्या काही मागण्या अ ब क प्रमाणे आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे ,अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे
, भाऊ साठे महामंडळ बंद पडलेले आहे ते सुरू झालं पाहिजे. एका मांगाने केलेल्या चुकीची शिक्षा सर्वच मातंग समाजाला देऊ नये व संपूर्ण मातंग समाज वेटीस धरु नये यासाठी बंद झालेले अण्णाभाऊ साठे महामंडळ त्वरित सुरू करा. अशी मागणी शासन दरबारी बागवे साहेब यांनी बाभुळगाव मधील अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्त या ठिकाणी केली.
यावेळी बाभुळगाव मधील सर्व नागरिक, पंचक्रोशीतील हजारो समाज बांधव व जयंती महोत्सव कमिटीतील सर्व सदस्य हजर होते.
