
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
संगणक परिचालक यांना त्वरित वेतन द्यावे बिरसा फायटर्स चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप मडावी यांची मागणी
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हातील ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालक ( ऑपरेटर) बऱ्याच वर्षापासून काम करीत आहेत. संगणक परिचालक हा एक ग्रामपंचायत चा दुवा झाला. ऑनलाईन प्रणालीमुळे ग्रामपंचायतचे सर्व कामे संगणक परिचालक याच्या वर अवलंबून आहेत. संगणक परिचालकाचे गेल्या चार-पाच महिन्यापासून वेतन न झाल्यामुळे पोळा सण अंधारात गेला व आता उपासमारीचे पाळी आली आहे. कुटुंबातील उदरनिर्वाह कसा भागवायचा या विवंचनेत संगणक परिचालक अडकला आहे. संगणक परिचालकावर आज उपासमारीची पाळी आली आहे.संघटनेने बेमुदत संप पुकारल्यामुळे ग्रामपंचायत मध्ये बरेच कामे खोळबले आहेत. विशेष म्हणजे गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आला होता. त्यापुरामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांचे सर्व्हे तलाठी व कोतवाल ,ग्रामसेवक करीत आहेत. परंतु ग्रामीण स्तरावर ऑनलाइन पद्धती च्या कामामुळे खेळखंडोबा झाला आहे . ग्रामपंचायत च्या संगणक आपरेटर ला ग्रामपंचायतचे सचिव व तलाठी वारंवार फोन करीत आहेत परंतु संघटनेचा संप असल्यामुळे त्यांच्याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे कामे खोळंबले आहेत. संगणक परिचालकांनी आमच्या कामाचा मोबदला आम्हाला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही. अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे संगणक परी चालकास न्याय मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यामुळे संगणक परी चालकास त्वरित वेतन देण्याची मागणी बिरसा फायटर्स चंद्रपूर संघटनेने केली आहे.