
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी.
इंगळी गावात दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे शेत पानंद रस्ते पुर्णपणे खराब झालेले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचे अत्यंत हाल होत आहे.
इंगळी गावात हजारो एकर शेती असून शेतकऱ्यांना रोज शेतात जावे लागते.दिवाळी नंतर साखर कारखाना हंगाम सुरू होत असतो.पुर येऊन गेलेने रस्ते खराब झालेले असतात.त्यामुळे ऊस तोडणी वेळत होत नाही.त्यामुळे ऊस उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट होत असते.शेतकरी वर्गाला रात्री अपरात्री शेतीला पाणी सोडणेसाठी जावे लागते.शेतीला रासायणीक खते घेऊन जाणेसाठी वहान रस्ता खराब असलेने जाऊ शकत नाही.शिवाय जनावरांना चारा डोकीवरून आणावा लागतो.
गावातील मोठ्याप्रमाणात जनावरे शेतात बांधलेली असतात.त्यासाठी महिलांना राडीचिखलातून जावे लागत आहे.सोयाबीन,शेंगा,भात,उडीद,या सारखी पिके कापणी केलेवर पोती दूर डोकी वरून आणावी लागतात
यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचेकडे मुख्यमंत्री सडक योजनेतून २कि.मी.पासून ५कि. मी.प्रर्यतंची एकूण ५०कि.मी. अंतराची शेत पानंद रस्ते व्हावीत अशी मागणी निवेदनाद्वारे ,कवि सरकार इंगळी आणि श्रीमंधर ऐतवडे.यांनी केली आहे.