
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – लोहा शहरासह ग्रामीण भागातील सर्व गणेश भक्तांनी पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करावा असे आवाहन लोहा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी केले आहे .
तब्बल दोन वर्षे कोरोनात गेल्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच कोव्हीड निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असुन या गणेश मंडळांनी गणेशमुर्ती पर्यावरणपूरक, व पाण्यात विरघळणारी शाडुच्या मातीची मुर्ती आणि शरीराला हानीकारक नसणारे रंग असणारी मुर्ती स्थापना करावी व गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा वापर करावा. सर्वोच्च न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या यांच्या सुचनेनुसार डिजे वरती पुर्णपणे बंदी असुन डिजे लावु नये नयेत पारंपारिक वाद्यांच्या सहहाय्याने मिरवणूक काढावी मिरवणुकीत गुलाल उधळु नये कारण त्यामधील केमीकलमुळे डोळ्यांचे विकार होण्याची दाट शक्यता आहे. झेडुच्या फुल्यांच्या किंवा अन्य फुलांच्या पाकळ्या वापराव्यात.
गणेश मंडळांनी शालेय विद्यार्थ्यांनासाठी चिञकला रांगोळी , व्याख्यान स्पर्धांचे आयोजन करावे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव व प्रेरणा मिळते गणेश उत्सव हा धार्मिक शैक्षणिक सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरा करावा असे आवाहन लोहा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी केले आहे.