
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा : – हरसद येथील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारा एक ध्येयवेडा तरूण युवक सुदर्शन शेबाळे सतत सामाजिक कार्यात तालुक्यात अग्रगण्य व मदतीला तातडीने धावुन येणारा दोन दिवसांपूर्वी राञीच्या वेळी एका पेंशन्टला घेऊन लोहा येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला यावेळी शासकीय दवाखान्याच्या आवात भयानक तनकट त्यामध्ये गाजर गवत तरवडा विविध प्रकारचे होते. या तनकटात राञीच्या वेळी साप विंचू वास्तव्यास आला व एखाद्या पेशेन्टला दंश केल्यास हकनाक बळी जाईल या भुमीकेतुन त्यांनी हे सर्व तनकट स्वखर्चातून काढायचे ठरवले.
लोहा येथील शासकीय रुग्णालयातील डॉ दिपक मोहिते हे सुदर्शन शेबाळे यांचे मिञ आहेत त्यांच्या सोबत चर्चा करुन सकाळी सरकारी दवाखान्याचा परीसर सुदर्शन शेंबाळे यांनी तणनाशकाची फवारणी करुन तणनाशकमुक्त केला .
यावेळी सर्व डॉक्टर टिमने व पेशेंटने सुदर्शन शेंबाळे यांचे कौतुक केले.