
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी -राम कराळे . . .
लोहा: कृषि प्रक्रिया जन जागृती पंधरवडा अतंर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रकीया उद्योग योजनेची तालुकास्तरीय कार्यशाळा तालुका कृषि कार्यलय लोहा सभागृहात पार पडली. यावेळी इच्छुक महिला, शेतकरी व इतर उद्योजकांना योजनेची माहिती, अर्ज प्रकीया व प्रकल्पाअंतर्गत अर्ज केलेल्या अर्जदारांची पुढील प्रकीया तसेच अडचणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, प्रकल्प उपसंचालक श्रीमती माधुरी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली PMFME योजनेचा लाभ घेऊन लोहा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला, महिला गट,यांनी वेगवेगळ्या अन्न प्रकीया क्षेत्रात उद्योजक व्हावे,असे आवाहन केले.
जिल्हा संसाधन व्यक्ती मोहम्मद गौस यांनी या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रकीया याबाबत मार्गदर्शन केले. तसेच इच्छुकांनी संपर्क केल्यास सविस्तर प्रकल्प आराखडा बनवून दिला जाईल,असे सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडिया लोहा शाखेचे वर्षा मॅडम, यांनी या योजनेंतर्गत बॅक प्रस्ताव व कर्जाशी निगडीत अडचणीबाबत मार्गदर्शन केले. यादरम्यान महिलांनी आपले अनुभव मांडले. यावेळी तालुका कृषि अधिकारी संदानद पोटपेलवार, कृ.पृ, कृ.स.उपस्थित होते, सुत्रसंचालन मंडळ कृषि अधिकारी टेकाळे, यांनी मांडले, प्रास्तविक सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सोहेल सय्यद, यांनी केले. आभार कृषि पृ.बि.एस.कापशीकर यांनी मांडले, यावेळी सौ.सविता सातेगावकर , शेतकरी राम पाटील पवार सायाळकर, सुधाकर टाक किवळेकर, इरफान शेख, संतोष गदेवार, फैयाज, महिला शेतकरी गट ,व शेतकरी उपस्थित होते.