
दैनिक चालू वार्ता लोहा प्रतिनिधी -राम कर्हाळे
कलंबर :- लोहा तालुका जूक्टा संघटनेच्या वतीने संजय गांधी ज्यूनियर काॅलेज कलंबरचे प्रा. डि. एम. भालेराव सर यांची लोहा तालुका उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच प्रा. एल. व्ही. पवार मॅडम यांची महिला सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. यानिवडीबदल संजय गांधी ज्यूनियर काॅलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला होता. यावेळी प्रा. वाघमारे सर यांनी प्रा. भालेराव सर यांचा सत्कार केला. तसेच महिला सदस्य प्रा. पवार मॅडम यांचा सत्कार प्रा. गोरे मॅडम यांनी केला. उपस्थित प्राचार्य श्री. एस. एन. मामडे साहेब, प्रा. शेट्टे सर, प्रा.शिंदे सर, प्रा. भुयारे सर,प्रा.मुंडे सर,श्री.एस. पी. जगंमे सर,श्री.कर्हाळे सर, श्री.अनिल कदम,श्री.नागेश तुप्पेकर, श्री.भगवान शिंदे,श्री.प्रल्हाद घोरबांड,श्री.बाजीराव पाटील,श्री.व्ही.जंगमे सर, श्री. लोहकरे पाटील यांनी नवनियुक्त प्राध्यापक मंडळीचा सत्कार करण्यात आला. सर्वाच्या वतीने पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.