
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:शेतकऱ्यांनी आपल्या सातबाराला पीक पेरा लावण्यासाठी शासनाने ई पीक पाणी ॲप्स लॉन्च केले आहेत त्या ई पीक पाहणी ची शेवटची तारीख 31 ऑगस्ट देण्यात आली होती पण हे जे ॲप आहे काही कारणास्तव काही शेतकऱ्यांच्या मोबाईल मध्ये चालत नव्हते यामुळे आझाद फाउंडेशन ने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे ई -पिक पाहणी ॲपच्या अडथळ्यामूळे जिल्ह्यातील शेतकरी वंचीत राहू नये म्हणून ई -पिक पाहणीची असणारी 31 ऑगस्ट ही तारीख वाढवून मिळवी यासाठी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांना आझाद ग्रूप तर्फे निवेदन देण्यात आले त्यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे दुसरे जिल्हाध्यक्ष बसवंत पाटील कार्याध्यक्ष दिपक मठपती शहराध्यक्ष रामेश्वर उदावंत उपाध्यक्ष लक्ष्मण जोशी सचिव आकाश वाघमारे नांदेड तालुकाध्यक्ष मनोहर बोकारे लोहा तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील मुखेड तालुकाध्यक्ष रमेश कापसे उमरी तालूका उपाध्यक्ष गोविंद यमलवाड महानगर संघटन छोटू यादव सचिव आविनाशा परडे सह आदी पदअधिकारी उपस्थित होते