
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर–
लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून कष्टकरी, शेतकरी, शोषित व कामगारांच्या वेदना मांडल्या. आण्णाभाऊंच्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे म्हणजे शेतकरी, कष्टकरी व कामगारांचा विद्रोह आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते कैलास येसगे कावळगावकर यांनी नरंगल येथे आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त केले. प्रमुख वक्ते म्हणून कैलास येसगे यांनी आण्णाभाऊ साठे यांच्याकडून प्रेरणा घेऊन बहुजन समाजाने संघटीत होऊन, उच्चशिक्षण घेऊन आपल्या विकासासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असे परखड मत याप्रसंगी मांडले.
निवृत शिक्षक शेख मुनिर पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रमुख अतिथी श्रीमती शितलताई अंतापूरकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रबोधन कार्यक्रमाला सुरूवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. व्यंकटराव पाटील गोजेगावकर (भाजप जिल्हाध्यक्ष नांदेड) हे होते. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्रा. डॉ. राजू बडूरे, मा. शंकर कुद्रे, मा. बा. नरंगलकर, अँड सूर्यवंशी, व संजय कांबळे यांची आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर यथोचित भाषणे झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून मा. माधवराव मिसाळे गुरुजी, भाजपा तालुका अध्यक्ष मा. शिवाजी कंनकंटे, मा. गंगारेड्डी कोटगीरे (सामाजिक कार्यकर्ते), मा. अॕड. सुर्यवंशी (सामाजिक कार्यकर्ते), मा. कैलास हसनाळे (पोलीस पाटील नरंगल), मा. गणेश माडपत्ते (सरपंच शहापूर), मा. राजेंद्र मंडगीकर (मा. सरपंच, मंडगी), मा. लक्ष्मण भंडारे (ग्रा.पं.सदस्य, शहापूर) या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत होती.
कार्यक्रमात स्व. आनंद शंकरराव पोतंगले यांच्या स्मरणार्थ मा. रोहिदास शंकरराव पोतंगले यांच्याकडून स्वच्छेने पहिली ते बारावी च्या सर्व मुला मुलींना वह्या व पेन वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन करून समाजाला येणाऱ्या सर्व प्रकारची अडचण सोडविण्यास मी सदैव आपल्यासोबत असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचलन देवीदास पोतंगले यांनी तर आभार लक्ष्मण गज्जलवार यांनी मानले.
प्रबोधन कार्यक्रम संपल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने निघून मातंग समाज मंदिराच्या प्रांगणात यशस्वी रित्या पार पडली.