
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
केन स्टार अकॅडमी मध्ये केन स्टार किड्स इंग्लिश स्कूल मध्ये गणेशोत्सवा निमित्त इको फ्रेंडली गणेशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चिखल, झाडांची पाने, शाडू माती, विविध प्रकारचे कडधान्य आश्या साहित्य पासून गणेश मूर्ती तयार करण्यात आली. चिखला पासून तयार करण्यात आलेल्या श्रींच्या मूर्तीमध्ये विविध बियांचे रोपण करण्यात आले, श्रींची मूर्ती विसर्जित करतेवेळी त्याचे रोपात रूपांतर होऊन ती रोपे शालेय परिसरात लावण्यात येणार आहेत.काही विद्यार्थ्यांनी झाडांच्या पानापासून गणेशा तयार केला. यातून विद्यार्थ्यां मध्ये निसर्गाची जाणिव जागृती निर्माण होऊन पर्यावरनाचे प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल, हे विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले. यात गुट्टे उत्कर्ष, माने काव्या, झोल शरयू, सावंत शौर्य, बोराडे भाग्यश्री, ढाले प्रीयल, बलिया सर्वज्ञ, शिवम चव्हाल, सचिन मोरे, संकेत सोनवणे, ज्ञानई खवने, आदित्य झोल, कृष्णा पवार, सानिका चव्हाल, कांबळे युवराज, आराध्या डासाळकर, रितिका वीर, अनुष्का इंगोले, श्रद्धा लाटे, मानसी वाघमारे, तनुजा लाटे, आयुष वाघमारे, ईश्वर थळपती, दर्शन आवटे, स्नेहल पूंगळे, अजिंक्य मगर आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी हि कार्यशाळा प्रिंसीपल संचालक श्रीराम रेंगे व संचालक कृष्णा गीते यांच्या मार्गदर्शना खाली संपन्न झाली. यावेळी शाळेचे प्रिंसीपल यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, यासाठी सर्वांनी स्वतः च्या घरी चिखला पासून किंवा शाडू मातीपासून श्रींची मूर्ती स्थापन करावी,यावी अशी भावना व्यक्त केली.