
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
जि.बोरगांव पोलीस ठाण्यांचे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची पोलीस प्रशासन विभागांमध्ये चांगलीच ओळख होती डॉ.सागर वाघ यांनी बोरगांव पोलीस ठाण्यांचा माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरुन गेले दोन वर्षांपूर्वी बोरगांव पोलीस ठाण्यांचा पदभार स्वीकारला होता. डॉ. सागर वाघ यांनी बोरगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित तसेच गुन्हेगारीवर त्यांनी चांगलाच वचक ठेवला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे बोरगांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये उघडकीस आणले बोरगांव पोलीस ठाण्यांचे सर्व पोलीस कर्मचारी यांच्यासह महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर मॅडम यांच्यासमवेत त्यांनी काम केले. बोरगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधिंत राहण्यासांठी भरपूर परिश्रम घेतले. बोरगाव पोलीस स्टेशन हे सातारा कोल्हापूर हवेलगत असल्यांमुळे बोरगाव पोलीस ठाण्यांचे सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी नेहमीच कर्तव्यांवर सतर्क असतात.डॉ. सागर वाघ हे महिन्याभरांपूर्वी सिक रजेवर गेले होते विनंतीवरुन त्यांची कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात नियुक्ती झाल्यांचे पोलीस कर्मचारी यांना समजताच पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी वाघ साहेबांचे अभिनंदन व त्यांच्या उत्कृंष्ट कामगिरीबद्दल कौतुक केले. डॉ. सागर वाघ यांच्या बदलीनंतर माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्या आदेशावरुन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून चेतन मछले यांच्याकडे बोरगांव पोलीस ठाण्यांचा पदभार सोपविण्यांत आला आहे.