
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काळगव्हान ग्रामपंचायतचे सरपंच श्री.ज्ञानदेव नारायण ढवळे यांना विशेष आदर्श सरपंच-२०२२ पुरस्काराचे मानकरी ठरले असून त्यांचा आदर्श गाव पाटोदा,विकासाचे महामेरू श्री.भास्करराव पेरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आला. सरपंच सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सरपंच मेळावा व आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा अंजनगाव सुर्जी येथील प्रभा मंगलम दि.२८ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झाला.
श्री.ज्ञानदेव नारायण ढवळे यांनी बोलतांना सांगितले की,गावामध्ये विकासात्मक कामे करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे मार्गदर्शन वेळोवेळी सुचना मिळाल्या त्यामुळेच इथपर्यंत पोहोचलो आहे.विविध योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहचवून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला.गावातील प्रत्येक नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे तसेच काळगव्हान आदर्श गाव होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष,जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी तसेच माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अमरावती बबलू देशमुख,उदघाटक तथा दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे,मार्गदर्शक मा.भास्करराव पेरे (पाटील),सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे,प्रमोद पाटील दाळू,शशिकांत मंगळे,सौ.पुजाताई काळे,प्रदीप देशमुख,राहुल उके,अमोल पाटील दहिभाते,सुधाकर खारोडे,दिनेश गाडगे,रणजीत तिडके,तहसीलदार अभिजित जगताप,राजकुमार मेश्राम,डॉ.शंकरराव ठाकरे,विनोद खेडकर,मंगेश तायडे,उत्तमराव ब्राम्हणवाडे,संदिपपाल गीते (महाराज),सतीश साखरे,सचिन मेहरे,रामपाल महाराज,सतीश चऱ्हाटे,सौ.शांताबाई अभ्यंकर,सौ.जयाताई येवले,कपिल देवके,कु.अंकिता तायडे,रामजी राठोड,रमेश सावळे,तेजस अभ्यंकर,विवेक देशमुख,ज्ञानदेव ढवळे,सौ.जयश्री पोटदुखे,अमर पाटील शिंगणे,सौ.राणीताई सावरकर,सौ.प्रेरणाताई वेताळे,भय्यासाहेब अभ्यंकर,सौ.प्रतिभाताई गायगोले,अमोल घुरडे आदी मान्यवर व नागरिक कार्यक्रमवेळी उपस्थित होते.