
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सोलापूर : करमाळ्यातील शिवसेना नेत्या रश्मी बागल आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यामध्ये रविवारी पुण्यात बैठक झाली.
या बैठकीनंतर रश्मी बागल या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आज मंत्री तानाजी सावंत हे साेलापूर जिल्हा दाै-यावर आल्यानं बागल यांच्या समर्थकांसह राजकीय वर्तुळातील कार्यकर्त्यांचे बागल यांच्या भुमिकेवर लक्ष लागून राहिली आहे
सन 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये रश्मी बागल या करमाळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात माजी आमदार नारायण पाटील हे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे होते. दरम्यान मंत्री तानाजी सावंत यांनी नारायण पाटील आणि रश्मी बागल यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अशी चर्चा आहे.
त्यातूनच मंत्री सावंत यांनी रविवारी रश्मी बागल आणि नारायण पाटील यांच्या समवेत बैठक घेतली आहे. यापूर्वी नारायण पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. रश्मी बागल यांच्या ताब्यात असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला मंत्री सावंत यांच्या भैरवनाथ शुगरने ९ कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याच्यानंतर आता रश्मी बागल या मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा चर्चा सुरू झाली आहे.
=====================
मंत्री तानाजी सावंत सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान रश्मी बागल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. रश्मी बागल यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे साेलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात पाेहचले आहेत. तेथे मंत्री सावंत यांनी विविध विभागांना भेट दिली. त्यांच्या अचनाक भेटीने रुग्णालय व्यवस्थापनास घाम फुटला आहे.
=======================