दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी – दत्तात्रय वामनराव कराळे
**************************
परभणी : तालुक्यातील शिंगणापूर येथील गोविंद कांबळे, औरंगाबाद येथील जनार्दन कासाळे यांच्या नुकताच निघृण हत्या करण्यात आल्या असून राज्यात कुठे ना कुठे मातंग वस्त्यांवर जाणीवपूर्वक हल्ले करण्याचे प्रकार सतत घडत आहेत. भविष्यात असे कोणतेही प्रकार घडले जाऊ नयेत यासाठी शासनाने संबंधितांवर त्वरीत कारवाईचा बडगा उचलावा शिवाय गोविंद कांबळे व जनार्दन कासाळे यांच्या आरोपितांना कठोर कारवाईचा इंगा दाखवला जावा यासाठी परभणीत हजारो मातंग बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढला होता.
सोमवार, दि. ०५ सप्टेंबर २२ रोजी जिंतूर रोडवरील ज्ञानोपासक महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळील मैदान दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चातील मातंग बांधवांनी हातात निळे झेंडे आणि मुखाने निरनिराळ्या घोषणा देत परिसर पूरता दणाणून सोडला होता.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी घोषणांद्वारा ज्या मागण्यांची पुकार केली आहे त्यात गोविंद कांबळे व जनार्दन कासाळे यांच्या कुटुंबीयांचे तात्काळ पुनर्वसन करा, समाज कल्याण विभागाकडून आर्थिक मदत केली जावी, दोन्ही प्रकरणांचे खटले जलद गतीने चालविले जावेत, मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी रुपये ५० लाखांची मदत केली जावी आदींचा यात प्रामुख्याने समावेश आहे.
या मोर्चात गणपत विशेष, प्रा. डॉ. मिलींद आव्हाड, विष्णू आव्हाड, उत्तम गो-हे, अरविंद सोनवणे, किशोर कांबळे, कुणाल गायकवाड व अन्य काही विशेष मान्यवरांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या हजारो मातंग बंधू-भगिनींनी घोषणा देत आसमंत दणाणून सोडला होता.
मोर्चेकऱ्यांसमोर विविध मान्यवरांनी आपले विचार संबोधित केले. त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनास निषेधाचे निवेदन दिले.
