
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी – प्रा .यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – श्री शिवाजी प्राथमिक , माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय माणिक नगर , नवीन कौठा नांदेड च्या वतीने दिनांक 8 सप्टेंबर 2022 गुरुवार रोजी मातोश्री स्व. सौ. सुलोचनाताई गुरुनाथराव कुरुडे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कुसुम सभागृह व्ही.आय.पी. रोड नांदेड येथे करण्यात आले आहे. पहिला गट वर्ग पाचवी ते आठवी असा असून प्रथम येणाऱ्यास 2001 रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे तर द्वितीय येणाऱ्यासाठी 1501रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दुसरा गट वर्ग नववी ते बारावी साठी असून प्रथम येणाऱ्या 3001 रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे तर द्वितीय येणाऱ्यास 2001 रुपये पारितोषिक ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जवळपास 25 शाळांनी सहभाग घेतला असून पहिल्या गटासाठी 32 तर दुसऱ्या गटासाठी 40 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाई गुरुनाथरावजी कुरुडे ( संस्था सचिव तथा माजी आमदार ) उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून जयश्रीताई निलेश पावडे ( महापौर नांदेड ) , डॉ. गोविंद नांदेडे ( शिक्षण तज्ञ , माजी संचालक शिक्षण विभाग पुणे ) ,प्रशांत दिग्रसकर ( शिक्षण अधिकारी , जिल्हा परिषद नांदेड ) , प्रमुख उपस्थिती प्रा.वैजनाथराव कुरुडे , ( अध्यक्ष संयोजन समिती तथा संस्था सदस्य ) , मधुकरराव कुरुडे ( शालेय समिती सदस्य ) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सर्व स्पर्धक , शिक्षक , नागरिक व पत्रकार बंधू-भगिनींना समारंभास उपस्थित राहण्याचे आव्हान संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा.वैजनाथराव कुरुडे , उपाध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक सुधीर कुरुडे , सचिव सूर्यकांत कावळे , सदस्य तथा उपप्राचार्य परशुराम येसलवाड , सदस्य तथा मुख्याध्यापक प्राथमिक विभाग दिलीप वाडेवाले यांच्यावतीने करण्यात येत आहे.