
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- भारत स्काऊटस् आणि गाईड्स जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने माहे ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रत्येक तालुक्यात शिक्षकांसाठी एक दिवशीय स्काऊट गाईड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेस स्काऊट गाईड उजळणी वर्ग,उद्बोधन वर्ग व बिगिनर्स कोर्स या नावाने संबोधले जाते.या कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षकांना स्काऊट गाईड व कब बुलबुल विषय चांगल्या पद्धतीने अध्यापन करता यावा याकरिता वर्षाच्या सुरुवातीला बिगिनर्स कोर्सचे आयोजन करण्यात आले.या कोर्समध्ये स्काऊट गाईडचे उपक्रम,विविध पुरस्कार,मेळावे,प्रशिक्षण,परिक्षापद्धती,अभ्यासक्रम,पथक नोंदणी,गणवेश,स्काऊट गाईड संस्थेची संरचना,स्काऊट गाईड विषयाबाबत शासनाची प्राथमिकता ईत्यादी विषयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अमरावती जिल्ह्यामध्ये शाळा तेथे पथक व घर तेथे स्काऊट गाईडची शिस्त या तत्त्वाचा अवलंब करण्यात आला आहे.शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त श्रीमती प्रिया देशमुख व शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा जिल्हा आयुक्त स्काऊट प्रफुल्ल कचवे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात जिल्ह्यात स्काऊट गाईड विषय प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी एक दिवशीय कार्यशाळा,प्राथमिक प्रशिक्षण,संघनायक मेळावे,राज्यपुरस्कार चाचणी शिबीर,जिल्हा मेळावा,राष्ट्रीय जांबोरी ईत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहेत.
शाळा-शाळांमध्ये पथक सूरु करुन अध्यापण करण्यास शिक्षक उत्सुक आहेत.जिल्ह्यामध्ये स्काऊट गाईड,कब बुलबुल विषय प्रभाविपणे अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक व सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.त्यांच्याच सहकार्याने शाळा तेथे स्काऊट गाईड पथक ही योजना यशस्वी होताना दिसत आहे.या विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून संजय रामावत,ज्ञानेश्वर टाले,विनायक निस्ताने,जसवंत बीजेवार,श्रीमती सुनिता ईथापे,श्रीमती बांबल,अनिता पुनसे,सुनिता गेही,वैशाली धाकुलकर,देवकी औघड,आनंद महाजन आणि वेळोवेळी अनेक अनुभवी शिक्षक बंधू भगिनींचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.जिल्हा कार्यालयाच्या वतीने जिल्हा संघटक रमेश जाधव व वैशाली घोम आणि सर्व कर्मचारी वृंद नियोजित कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अथक परिश्रम घेतले.