
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी- राम चिंतलवाड
शहरातील परमेश्वर गल्ली येथील नामे प्रल्हाद माने यांच्या आईचे दि.०३सप्टेंबर२०२२रोजी अचानक वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले होते.शहरातील लकडोबा चौक येथील असलेल्या हिंदू स्मशानभूमीमध्ये कुटुंबातील नातेवाईकांकडून रात्री उशिरा अंत्यविधीचा कार्यक्रम करण्यात आला होता.त्या स्मशानभूमीत ना लाईटची व्यवस्था ना,बसण्याची व्यवस्था,पिण्यासाठी पाणी,बसण्यासाठी बाकडे,ओटे नाहीतअशी कोठलिही व्यवस्था नसल्याने त्या ठिकाणी कचर्राचे ढिग,बसण्यासाठी बाकडे,ओटे नाहीत व वाढलेल्या गांजर गवताने येथील नागरिकांना स्मशानभूमीत साधे उभे टाकण्याची जागा सुद्धा उपलब्ध नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना भितीचे वातावरण निर्माण झाले होते.एवढ्या कठिण परिस्थितीत संबंधित मृत्युमुखी झालेल्या कुटुंबातील नातेवाईकांनी अंधारातच त्या मयत महिलेचा अंत्यविधी उरकून घेतला होता.पण अंत्यविद्यासाठीआलेल्या नागरिकांनी संबंधित नगरपंचायतीच्या प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे उडवीत येथील स्मशानभूमीमध्ये तात्काळ स्थानिक लोकप्रतिनिधींनी ह्याची दखल घेऊन कायमस्वरूपी हाय मॅक्स लाईट बसून आगामी काळात शहरातील गोरगरीब नागरिकांची अंत्यविधीसाठी आल्यावर गैरसोय होणार नाही. ह्याची काळजी घ्यावी अशी मागणी वांरवार होऊन कामे झाले नाही.शहरातील परमेश्वर गल्ली येथे दि.०३सप्टेंबर२०२२रोजी एका वृद्ध महिलेचा वृद्धापकाळाने अचानक दुःखद निधन झाले होते.त्यामुळे त्यांच्याअंत्यविधीचा कार्यक्रम शहरातील हिंदू समशानभूमी येथे सायंकाळी उशिरा करण्याचे नातेवाईकांनीआयोजिले होते.त्यामुळे अंत्यविधीसाठीआलेल्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी स्मशानभूमी येथे जाताच त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसूनआले चक्क स्मशानभूमीतमध्ये लाईटची कोठलिही सुविधा नसल्याचे नागरिकांनाअंधारात रस्ता शोधुन उभा टाकण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध नसल्याने संबंधित अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केलेआहे.स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची तात्काळ दखल घेऊन कमीत कमी स्ममशानभूमी सारख्या ठिकाणी तरी विद्युत खांबावर लाईटच्या हायमॅक्सची सुविधा बसूनआगामी काळात होणाऱ्या दुःखद घटनांमुळे त्यांच्या कुटुंबातील नागरिकांची होणारी गैरसोय तरी दूर करावीअशी तिखट प्रतिक्रिया अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनी बोलून दाखवतआहेत.यामुळे शहरवासियांना खाली मान घालण्याची वेळ स्मशानभूमीच्यां अविकशीत आणि अर्धवट कामामुळे झाल्याने याकडे सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्षांच्या स्थानिक नेते,कार्यकर्ते,पुढारी फक्त मतदान घेण्यासाठीच मताचा जोगवा मागण्यासाठी फिरत असतात.लोकप्रतिनिधी यांचे लोकडोबा चौकाजवळील हिंदू स्मशानभूमीकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप येथील युवा राजकीय कार्यकर्ता लक्ष्मण डांगे यांनी केलाआहे.नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना या स्मशानभूमीत एक विंधन विहीर मारून अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी मी केली होती.ती सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांने पूर्ण केली नाही.आज तर अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी उभा राहण्यासाठी साधीजागा सुद्धा उपलब्ध नाहीआहे. वाढलेल्या गाजर गवताने महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये रात्री भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळतआहे.त्यामुळे आता तरी मुख्याधिकारी नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी स्मशानभूमीमध्ये मोठे हायमक्स एलएडी चार खांबांवर लाईट बसवण्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणी युवा कार्यकर्ता लक्ष्मण डांगे यांनी केली आहे.