
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
**************************
परभणी : सर्व सोई-सुविधांयुक्त, आकर्षक आणि आधुनिक पध्दतीचे नियोजित नाट्यगृह विहित मुदतीत तयार होणे गरजेचे असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तात्काळ तयार करा, असे निर्देश महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी अभियंता वशीम पठाण यांना दिल्या.
सुमारे २१ कोटींची लागत लावून परभणी शहरात एक अत्याधुनिक अशा नाट्यगृहाची निर्मिती केली जात आहे. संपूर्ण वातानुकूलित सुविधा, आकर्षक व अत्याधुनिक अशा मुलभूत सोई-सुविधांसह या नाट्यगृहाची निर्मिती केली जाणार आहे. नियोजित कामाचा आढावा घेऊन कामाची प्रगती व पहाणीसाठी आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी भेट दिली. सोबत अभियंते व सहकारी अधिकारी सुध्दा होते.
या प्रसंगी परभणी जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपूडकर, परभणी शिवसेना आमदार डॉ. राहूल पाटील यांच्यासह अन्य कांही मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी आमदार महोदयांनी सुध्दा काही विधायक सूचना केल्याचे समजते. सुमारे २१ कोटी रुपयांची लागत या नाट्यगृहाच्या निर्मितीसाठी अपेक्षित असली तरी तुर्तास केवळ ११ कोटी रुपयांचाच प्रस्ताव तयार केल्याचे समजते. उपस्थित आमदारद्वयांच्या सूचनांसह आणखी कांही महत्वपूर्ण अशा सूचना करीत त्यांचीही योग्य पध्दतीने दखल घेण्याचे निर्देश आयुक्त सांडभोर यांनी शहर अभियंता वशीम पठाण व पवन देशमुख यांना दिले आहेत. त्याशिवाय सदर नाट्यगृह विहित मुदतीतच तयार होणे अपेक्षित असून त्या पध्दतीने व तयारीने बांधकाम पूर्णत्वास गेले पाहिजे, असेही सांगितले. कामांचा दर्जा उत्कृष्ट व देखना असणे गरजेचे असून त्यात आधुनिक पध्दतीची नाट्यगृहाच्या शोभून राहील अशी सुंदर कलाकृती केल्यास अधिक आकर्षक असे हे नाट्यगृह दिसून येईल. त्यासाठी आयुक्तांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, यात शंकाच नसावी.