
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोरेगांव-संभाजी गोसावी करंजखोप गावांतील सालाबाद प्रमाणे वाघजाई विकास मंडळाने गणेश उत्सवांच्या काळामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम राबवत गणेश उत्सव आनंदात साजरा केला. यावेळी वाघजाई विकास मंडळाने गावातील सर्व गणेश भक्त तसेच ग्रामस्थ माता बहिणी यांच्या उपस्थितीमध्ये सत्यनारायण महापूजा तसेच महाप्रसादांचे आयोजन करण्यांत आले होते. यावेळी करंजखोप गावातील सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. गणेशोत्सवा काळामध्ये कोरेगांव तालुक्यांतील विविध मान्यवर मंडळी तसेच वाठार पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय संजय बोंबले साहेब यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळींना मंडळाच्या वतीने आरतीचा मान देण्यांत आला होता. शुक्रवारी सायंकाळी लाडक्या राजाच्या विसर्जनांची मंडळाच्या सर्व गणेश भक्तांनी पारंपरिक वाद्यांमध्ये गावातून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला ! अशा घोषणा देत मंडळातील सर्वच गणेश भक्तांनी वाठार पोलीस प्रशासनांचे निर्बंध पाळत शांततेमध्ये मिरवणूक काढण्यांत आली. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! अशी साथ घालत यावर्षीचा गणेशोत्सव पार पडला गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागला होता. मात्र यावर्षी राज्यांमध्ये नव्या सत्ताधाऱ्यांचं आगमन होताच त्यांनी राज्यांतील सर्व निर्बंध मागे हटवत यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहांत पण नियम पाळत साजरा करण्यांचा निर्णय दिला. वाघजाई मंडळाच्या वतीने आरतीसाठी आलेल्या विविध मान्यवरांचे ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये शाल श्रीफळ,देवुन त्यांचे भव्य स्वागत करण्यांत आले. यावेळी लोकप्रिय पत्रकार म्हणून परिचित असणारे करंजखोप गावचे सुपुत्र श्री. संभाजी पुरीगोसावी यांचाही वाघजाई मंडळाच्या वतीने शाल,श्रीफळ देवुन सत्कार करण्यांत आला होता. तसेच यंदाचा गणेशोत्सव सातारा जिल्ह्यासह, तालुक्यांच्या ठिकठिकाणी मोठ्या उत्साहांत साजरा करण्यांत आला. सर्वच मंडळातील गणेश भक्तांनी पारंपारिक वाद्यांच्या माध्यमांतून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तसेच सर्वच मंडळातील गणेश भक्तांनी पोलीस प्रशासनांला सुद्धा चांगलेच सहकार्य केले.