
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा. प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कौठा :-कौठा येथील कै. शंकरराव पाटील मेमोरीयल एज्युकेशन सोसायटी नांदेड संचलित शंकर कनिष्ठ महाविद्यालयाने NEET 2022 परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. या परिक्षेत नागलगावकर श्रेयश दिलीप ६६० गुण, बेजगमवार अनिरुद्ध प्रल्हाद ६०५ गुण,पाटील समृद्धी शिवाजीराजे ५७० गुण, मुश्कम गणेश परशुराम ५२८ गुण या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्याचे मा. आ. वसंतरावजी चव्हाण, आ.श्री.मोहन अण्णा हंबर्डे, नगरसेवक श्री.राजू पाटील काळे, श्री.आनंदराव पा. चव्हाण, श्री.मोहनराव पा. सुगावकर, संस्थेचे अध्यक्ष मा. प्राचार्य श्री. गोविंदराव शं. मेथे सर, सचिव प्रा.श्री.तिरुपती मेथे सर, संस्थेचे सदस्य श्री. इंजि. विलास पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.