
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:जी के इंटरनॅशनल स्कूल उदगीरच्या वतीने पाच सप्टेंबर रोजी उदगीर, जळकोट आणि देवणी तालुक्यातील एक हजार शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उदगीर, जळकोट व देवणी तालुक्यामधील प्रत्येक गावातल्या शाळेत जाऊन, सन्मानाने सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व प्राध्यापक बंधू आणि भगिनींना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले होते. कार्यक्रमाला आवर्जून मोठ्या प्रमाणात प्राध्यापक, शिक्षक व शिक्षिका सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होत्या.
याप्रसंगी राज्याचे माजी मंत्री आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेब यांनी शिक्षकांच्या प्रश्नाबाबत पोट तिडकीने सभागृहात मांडून शिक्षकांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करेन. मतदारसंघात जिल्ह्यात कोठेही शिक्षकावर अन्याय होणार नाही याची वैयक्तिक काळजी घेईन.माननीय विक्रम बाप्पा काळे यांनी शिक्षकांबद्दल सभागृहात मांडलेल्या विविध प्रश्नांचा आढावा सादर केला. शिक्षकावर
कोठेही आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, झालाच तर तो सहन करणार नाही. कोणीही शिक्षकांच्या
विरुद्ध अवाजवी विधाने करू नयेत ती खपवून घेतली जाणार नाहीत.
शिक्षकांना शिकू द्या, विद्यार्थ्याची गुणवत्ता विकसित करू द्या.
इतर कुठल्याही विभागाचे काम शिक्षकावर लादता येणार नाहीत अशी ठाम भूमिका मांडली.
जिल्ह्याचे तरुण तडफदार नेतृत्व आदरणीय राहुल भैया केंद्रे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बाला उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विकासासाठी कसा प्रयत्न केला ही गाथा मांडली. राजकीय पक्ष कोणतेही असो मात्र शिक्षण क्षेत्रात राजकारण आणू नये, सर्वांनी मिळून लातूरच्या शैक्षणिक पंढरीचा वसा बिरादार सरांच्या माध्यमातून पुढे चालवण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत चालायला तयार आहोत. त्यांच्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिकवतात हा उपक्रम चाकूर तालुक्यातील एका शाळेमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आणि हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे. यातून विद्यार्थ्यांचा विकासच होणार आहे त्याबद्दल जीके इंटरनॅशनल स्कूल ला खूप खूप शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावाना संस्थापक अध्यक्षरमेश बिरादार यांनी केली. शाळा चालवणे शाळेच्या माध्यमातून दोन पैसे कमवणे हा उद्देश जरी समाजाला दिसत असला तरी बदलत्या शैक्षणिक पद्धतीमध्ये जागतिक लेव्हलवर चाललेले शिक्षणातील बदल, विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुंदर व सुरक्षित अशा भौतिक सुविधा पुरविण्याचे काम काळानुसार नवीन येत असलेल्या सीबीएससी बोर्डाच्या शाळेच्या माध्यमातून आपल्याला पहावयास मिळत आहे. भविष्यात जो स्पर्धेत उतरेल, गुणवत्ता देईल तोच टिकेल, पालकांना पैसे देण्याचा प्रॉब्लेम नाही, तर त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यात गुणात्मक बदल व गुणवत्ता हवी आहे. म्हणूनच
ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल लातूर च्या माध्यमातून मागील दहा वर्षात स्वयं अध्ययन पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिकवतात हा उपक्रम राबवून राज्याला दिशा देण्याचे काम करत असताना, आता माझी जन्मभूमी व कर्मभूमी उदगीर येथे जी. के. इंटरनॅशनल स्कूल उदगीर च्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात सेल्फ लर्निंग चा पॅटर्न विकसित करण्यासाठी दोन केंद्र समाजासाठी समर्पित करत आहोत.
जिल्ह्यातील सर्व स्तरातील शिक्षक, शिक्षण अधिकारी, राज्यकर्ते यांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठीचे वेळोवेळी चर्चा करून लातूर जिल्ह्याचा शैक्षणिक विकास करण्याचा ध्यास माझ्या उराशी बाळगला आहे असे रमेश बिरादार यांनी सांगितले.
शिक्षक दिनानिमित्त सर्वप्रथम माझे गुरु ज्यांच्यामुळे मी घडलो असे आदरणीय पीजी पाटील सर व आदरणीय
अभंगराव कोयले यांचा आदर युक्त सत्कार करून शुभ आशीर्वाद घेतले व सर्व उपस्थित शिक्षकांना शिक्षक दिनाच्या
लाख लाख शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास सुयश बिरादार सुजित बिरादार, रामेश्वर सगरे, प्राचार्य हरीश गौड, विठ्ठल सर व इतर सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी राहुल हाके, ज्ञानेश्वर भामरे, संतोष बिरादार, घोगरे सर, श्री ज्योतीराम पवार, सौ अनिता स्वामी, सौ स्वप्नाली पाटील, सौ रामेश्वरी कदम, आम्रपाली सर्वोदय, सौ रेशमा मोहिते इत्यादींनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला
उपस्थित सर्व शिक्षकांना सन्मानचिन्ह, शॉल व शिक्षणावर आधारित आत्मचिंतनाचे एक पुस्तक भेट म्हणून सर्व शिक्षकांना देण्यात आले. भविष्यात जी के इंटरनॅशनल स्कूल शी सोबत राहून काम करणाऱ्या इच्छुक शिक्षकांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून वारंवार शैक्षणिक उपक्रमाची देवाण-घेवाण करत, विद्यार्थ्यांच्या विविध विकास गुणांना वाव देण्यासाठी विविध खेळाच्या स्पर्धा, विज्ञान, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा..
अशा वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांशी जुळवून
शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.. असे त्या शाळेचे संस्थापक श्री बिरादार सर यांनी कार्यक्रमानिमित्त सांगितले.