
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
नांदेड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची राज्यांची उपराजधानी असलेल्या नागपुरात जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यांत आली. नव्या सरकारचा आदेश पाळत नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर हे नागपुरात हजर राहून तेथील तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती. आर. विमला मॅडम यांच्याकडूंन त्यांनी पदभार स्वीकारला. मात्र डॉ. विपिन इटनकर यांच्या बदलीनंतर नांदेडचे जिल्हाधिकारी पद हे मात्र जवळपास महिना झाला नव्या सरकारकडूंन अजून रिक्तच आहे. मात्र नांदेड जिल्हाधिकारी म्हणून अतिरिक्त कारभार खुशालसिंग परदेशी यांच्याकडे सोपविण्यांत आला आहे. मात्र सोशल मीडियावर नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांची नुसतीच नावे समोर येत आहेत. यामध्ये… आस्तिक कुमारपांडे,दीपा मुधोळ मुंडे, डॉ.वर्षा ठाकूर अशा अनेक आयएएस अधिकाऱ्यांची नावे समोर येत आहेत. पण अजूनही नांदेडकरांना मात्र नव्या जिल्हाधिकाऱ्याची उत्सुकता लागू झाली आहे. डॉ. विपिन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यांमध्ये ज्यादा कालावधीमध्ये नांदेडकरांची चांगलीच मने जिंकली होती. तसे त्यांचे काम ही उत्कृंष्ट जिल्हाधिकारी म्हणून नांदेडकरांसाठी ते ठरले. मात्र दैनिक चालू वार्ताचे प्रतिनिधी संभाजी गोसावी याबाबत नांदेडकरांना जिल्हाधिकारी मिळण्यासांठी अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्याशी नेहमी संपर्क साधत आहेत. मात्र अप्पर मुख्य सचिव यांच्याकडूंन अजूनही काही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यांत येणार आहेत. त्यानंतर नांदेड जिल्ह्यांला नव्या जिल्हाधिकारीची वर्णी लागेल असे सांगण्यांत येत आहे. अजून नांदेड जिल्हावासियांना नव्या जिल्हाधिकारीसाठी प्रतीक्षाच करावी लागणार असे नव्या सरकारकडूंन चांगलेच दिसून येत आहे. नांदेड जिल्हा वाशियाकडूंन आयएएस दर्जेतील कर्तव्यदक्ष आणि तरुण तडफदार अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी आता नांदेडकरांना मधून होत आहे. पण नांदेड जिल्हा हा माजी उप.मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्या माजी उप.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे जरी सत्तेत नसले तरी नांदेड जिल्ह्यांमध्ये त्यांनी आपल्या मार्गदर्शनांत नांदेड जिल्ह्यांचा चांगलाच विकास त्यांनी केला आहे. तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. तसेच अशोक चव्हाण यांनी अनेक कामे मार्गी गोर,गरिबांच्या हाकेला नेहमी धावून येणारे महाराष्ट्रांतील माजी उप.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची चांगलीच ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या मर्जीतला अधिकारी येणार की काय अशीही प्रतीक्षा आता नांदेडकरांना मधून दिसुन येते आहे.