
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
===================
मदनवाडी ता. इंदापूर येथील श्रीमंत विघ्नहर्ता तरुण मंडळाच्या व ग्रामस्थांच्या वतीने भकासवाडी या परिसराचे दत्तनगर असे नामांकरण करण्यात आले आहे. या नामांकरण सोहळ्यास आदरणीय माजी राज्यमंत्री श्री दत्तामामा भरणे उपस्थित होते. यावेळी या भागातील नागरिकांनी गणेशमंदिरासाठी सभा मंडपाची मागणी केली. यावर त्यांच्या मागणीला त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत मामांनी गणेशमंदिर सभामंडपास ५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला. धन्यवाद मामा यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत नाना बंडगर, धनाजी थोरात, नानासाहेब बंडगर,सचिन बोगावत,नितीन काळांगे, ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच महीला ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.