
दैनिक चालू वार्ता मुक्ताईनगर प्रतिनिधी-सुमित शर्मा
(मुक्ताईनगर): कुऱ्हा दुराक्षेत्र (पोलीस स्टेशन )येथे कार्यरत असलेले पो. कॉ. प्रमोद इंगळे यांनी आपल्या मुलाच्या हर्ष याच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम केला. त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त कुऱ्हा आश्रम शाळा येथील गरीब व आदिवासी मुलांना पेन, पुस्तक, वही वाटप करून आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. त्याचप्रमाणे शाळेतील सर्व मुलांना मनसोक्त जीवनही त्यांनी वाढदिवसानिमित्त दिले त्यांच्या या उपक्रमामुळे शाळकरी मुले उत्साहीत झाली. त्यांच्या या उपक्रमात त्यांचे काही सहकारी व मित्र मंडळी जसे पो.कॉ. नावकर ,पो. कॉ. सागर सावे, पो. कॉ. लाठे पो. कॉ. सोनवणे यांचाही सहभाग दिसून आला. त्यांच्या या कार्यामुळे पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात वाह- वाह मिळाली. त्यांच्या अशा या उपक्रमामुळे जनतेचा पोलिसाबाबत दृष्टिकोन बदलत आहे.