
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
राम मंदिरांच्या निर्माणासाठी कायदेशीर अहोरात्र लढाई करीत करणारे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे निधन झाल्यांचे वृत्त समोर आले आहे. मध्यप्रदेश नरसिंहपुर मधील ज्योतेश्वर मंदिरांत त्यांनी अखेरचा श्वांस घेतला. ते ९९ वर्षाचे होते बऱ्याच काळापासून ते आजारी होते. ३ सप्टेंबर रोजी त्यांनी नुकताच आपला ९९ वा वाढदिवस साजरा केला होता. ते द्वारकाच्या शारदापीठ आणि ज्योतिमठ मठ बद्रीनाथचे शंकराचार्य होते. शंकराचार्यांनी राम मंदिर निर्माणासांठी कायदेशीर अहोरात्र लढाई लढली. त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनातही सहभाग घेतला होता. स्वरुपानंद सरस्वती यांना हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरु मानले जात होते. अनुयायी आणि शिष्य होते. त्यांच्या निधनांच्या वृत्तानंतर आजूबाजूच्या भागांतील अनेक लोकांनी व धार्मिक संप्रदायिक मंडळींनी अंत्यदर्शनासाठी येत आहेत.