
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा. प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- तालुक्यातील सर्व पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्यांना कृषी अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. आपल्या तालुक्यात चार दिवसापासून सतत पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच पुरामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे ७२ तासांचा आत पिक विमा कंपनीला कळविणे आवश्यक असून कंधार तालुक्यातील सर्व पिक विमाधारक शेतकऱ्यांनी ईमेल, टोल फ्री दुरध्वनी नंबर १८००२३३७४१४ वर फोन करून किंवा अॅप डाउनलोड करुन अॅपवर पिक नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीला ७२ तासांचा आत द्यावी असे जिल्हा कृषी अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. याची सर्व पिक विमाधारक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.