
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील उंबरखेड,भोटा,कवाडगव्हाण व चांदुर बाजार तालुक्यातील चांदूरवाडी तसेच धारणी तालुक्यातील हरिसाल या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान रविवारी (१८ सप्टेंबर) होणार आहे.सर्व मतदारांना हक्क बजावता यावा यासाठी या क्षेत्रातील सर्व दुकाने,निवासी हॉटेल्स,खाद्यगृहे,व्यापार,औद्योगिक उपक्रम तसेच नागरी वसाहती या क्षेत्रातून कामासाठी येणाऱ्या सर्व कर्मचारी,कामगार बांधवांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्यात यावी,असे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.
शहरी भागात किंवा निवडणूका नसलेल्या भागातील दुकाने,कंपन्या,आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही.अमरावती तालुक्यातील रोहणा व तिवसा तालुक्यातील आखतवाडा या दोन ग्रामपंचायती यापूर्वीच अविरोध झाल्या आहेत.