
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी -प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड – मराठवाड्यात शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी मारणारे व संस्थेचा वेगळा ठसा उमटवणारी संस्था म्हणजे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार ही संस्था असून या संस्थेचे श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड चे नाव सदैव गुणवत्तेच्या यादीत झळकत असते गुणवत्तेचा उच्चांक म्हटले की श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर चे नाव येणारच असे ब्रीद वाक्य तयार झालेले शैक्षणिक क्षेत्रात दिसून येते. कॉलेजचा गुणवत्तेचा चढता आलेख कायम लक्षात घेत असता व पहात असता काल परवाच नीट परीक्षेचा निकाल लागला असून नुकताच राष्ट्रीय पातळीवरील JEE ADVANCE परीक्षेचा सुद्धा निकाल लागला आहे.
राष्ट्रीय पातळीवरील JEE ADVANCE परीक्षेत कॉलेजच्या पियुष शिवाजीराव पाटील या विद्यार्थ्यांनी देशात 184 रँक मिळवून कुटुंबाचे व स्वतःचे आणि कॉलेजचे नाव उज्वल केले आहे. तसेच तो JEE ( MAINS ) मध्ये 99.91% पर्सेंटाइल मिळून उत्तीर्ण झाला आहे आणि KVPY परीक्षा क्वाँलिफाईड झाला आहे. एवढेच नव्हे तर हरी ओम गोविंदराव इंगळे JEE – MA8NS ( 97.91 ) आणि शंकर व्यंकटराव उपासे JEE (MAINS) ( 95.77 )पर्सेंटाइलने उत्तीर्ण होऊन कॉलेजचे व स्वतःचे नाव लौकिक केले आहे.
एवढेच नव्हे तर NEET EXAM 2022 मध्ये शरद विनायकराव शिंदे – ( 635 ) , कु.आपुलकी अंबादास देशमुख – ( 606 ) ,कु.जान्हवी कैलास कुरुडे – ( 565 ) कु.शालिनी डाकुलगे – ( 556 ) या विद्यार्थ्यांनी ( अनुक्रमे कंसातील ) गुण मिळवून मेडिकल प्रवेशास पात्र होण्याचा बहुमान मिळवला आहे तसेच यापूर्वी कु. वेदांती देशमुख या विद्यार्थिनीने NIT भोपाळ येथे इंजीनियरिंग चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अशा या यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.
या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी संस्थेचे सचिव , माजी आमदार , ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी भाई गुरुनाथराव कुरुडे यांची प्रमुख उपस्थिती होती सचिव साहेबांच्या हस्ते सर्व यशवंत , गुणवंत , किर्तीवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शाल , श्रीफळ व पुष्पहार घालून -हदयस्पर्शी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मनोगतात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी अभ्यासाचा दिवस रात्र करून विद्यार्थ्यांनी जीवनाला एक वेगळी कलाटणी द्यावी व आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरावे अशा प्रकारचा सूचक सल्ला माननीय सचिव साहेबांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना दिला व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले याप्रसंगी अनुक्रमे शालेय समिती सदस्य एम.पी. कुरुडे , इंद्रजित बुरपल्ले , कॉलेजचे प्राचार्य सुधीर भाऊ कुरुडे , उपप्राचार्य परशुराम येसलवाड , उप मुख्याध्यापक डी.पी. कदम , पर्यवेक्षक माधव ब्याळे , श्री सदानंद नळगे व शिवराज पवळे ,( पर्यवेक्षक माध्यमिक ) , प्राथमिकचे मुख्याध्यापक दिलीप वाडेवाले आणि सहशिक्षक व्यंकटराव उपासे तसेच संस्थेचे सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे यांचे काळजीवाहक निलेश गायकवाड व ( वर्गावर अध्यापन करणारे सर्व प्राध्यापक वगळता ) प्रा. उमर शेख .श्री प्रशांत कुरुडे , श्री बालाजी निरपणे दैनिक चालू वार्ताचे नांदेड शहर प्रतिनिधी समर्थ लोखंडे. प्रा.रेश्मा शेख , प्रा. रत्नमाला नवघरे , प्रा.कपिल सोनकांबळे , सेवक किसन मामा जाधव तसेच तुळसाबाई जाधव इत्यादी सह पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता कार्यक्रमाची सुरुवात प्रा.जामकर दिपाली यांनी वंदे मातरम या गीताने केली तर सूत्रसंचालन कॉलेजचे स्वच्छता विभाग प्रमुख प्रा मुरलीधर घोरबांड यांनी केले आणि पर्यवेक्षक माधव ब्याळे यांच्या आभार प्रदर्शनाने राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.