दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर(प्रतिनिधी)-दि/१४/०९/२२
प.पू.गोळलवकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आले भारतात अनेक भाषा बोलले जातात.पण जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा इंग्रजी भाषेचे वर्चस्व वाढू लागले.1947 रोजी भारत स्वतंत्र झाला व संविधान अमलात आणण्यासाठी कोणत्या भाषेचा वापर करावा यावर चर्चा होऊ लागली.तेव्हा सर्वांनुमते हिंदी हिच आपली राष्ट्रीय भाषा असे घोषित करण्यात आले.तो दिवस म्हणजे 14 सप्टेंबर 1949. परंतु पहिल्यांदा हिंदी दिवस 1953 रोजी साजरा करण्यात आला व त्यावेळेपासून दरवर्षी हिंदी दिवस साजरा केला जातो.अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच हिंदी विषय शिक्षक दमन देगांवकर सर यांनी मुलांना दिली.
याप्रसंगी सर्व कर्मचारी वर्ग सचिन जाधव, स्मिता कुलकर्णी,रूपा पांचारे, सविता बेजगमवार व सुरेखा तोटावार उपस्थित होते.
