
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
मादाळी :- कंधार तालुक्यातील मादाळी/खंडगांव (हमीद) येथील सेवा सहकारी सोसायटी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेली असून नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांची लोकप्रियता वरचेवर वाढत असून त्याच्याकडे एक एक स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात येत आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार त्यांचेच असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य वाढत आहे.मादाळी व खंडगांव या दोन गावात संयुक्त सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमनपदी सौ.इंदूबाई रामराव राहाटे,व्हाईस चेअरमनपदी श्री. वडगावे रावसाहेब दिंगाबर तसेच सदस्यपदी मोरे बापुराव बाबा, वडजे निवृत्ती पांडुरंग, गायकवाड परसराम ग्यानोबा, वडजे सुभाष हारी, चंदनफुले दत्ता गंगाराम, शेख फेरोज, वडगावे तुळसाबाई केशव, गायकवाड सारजाबाई पिराजी यांची निवड झाली आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकारी यांचे खासदार साहेबांनी अभिनंदन केले आहे. तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.