
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी-शहाबाज मुजावर
किल्ले पन्हाळगड प्रवेशद्वार चार दरवाजा येथे असणाऱ्या सादोबा तलाव हे ऐतिहासिक असे तळे असून या तळ्याचे बांधकाम 1556 साली झाले होते असे इतिहासात नोंद सापडते. काल आणि आज त्याची सुरक्षा भिंत मोटवान अतिवृष्टीमुळे पडली होती. आज सकाळी पहाटे 4.00. च्या दरम्यान संपूर्ण मोटवान पडले.चारही बाजूच्या संरक्षण भिंतींना फुगवटा आला असून या भिंती देखील केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यामुळे परिसरात नागरिकाच्या मनामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.सध्या कोणतीही जीवीत हानी झाली नाही आहे.नगरपरिषद प्रशासनाने किल्ल्याचे प्रवेशद्वारच्या तलावावर खर्च करणे अपेक्षित आहे. कारण लोक शोरूम पाहत असतात गोडाऊन नाही असे प्रसन्ना एक्सप्रेस शी बोलताना सामाजिक कार्यकर्ते नियाज मुल्ला यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी माजी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, स्थानिक आमदार विजय कोरे ,खासदार धैरशील माने हे मुख्य रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी आले असताना दि, 7/5/22 रोजी दुरुस्तीसाठी निवेदन दिले होते. हेच निवेदन स्थानिक प्रशासनाला पण देण्यात आले होते
आज पुन्हा एकदा मुख्य रस्त्याला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती सध्याच्या परिस्थिती ला आपल्याला पाहाव्यास मिळत आहे . हा संपूर्ण हळू-हळू ऐतिहासिक तलाव मुजत जाऊ शकतो अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.हा ऐतिहासिक तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर सध्या आहे. तसेच या मोटवान वरून सर्वच गावातील मुले पोहण्यासाठी आल्यानंतर इथून उड्या मारत असत ते आता च्या पिढीला मिळणार नाही.ते आता इतिहास जमा झाले असंच या दोन वर्षात अतिदृष्टीमुळे संपूर्ण पन्हाळगड च्या तडबंदी इमारती पण ढासळत आहेत यासाठी गावातील नागरिकांनी निवेदन तयार केले आहे.
यावेळी ज्येष्ठ गाईड रजाउल्ला मुल्ला, बाबुराव जगताप,अकिब मोकाशी, राजू नगारजी, राजू मुल्ला, सचिन वरेकर, मोहसीन मुजावर, इत्यादी उपस्थित होते,किल्ल्याच्या असेच पडझड होत राहिल्यावर एक दिवस पन्हाळागड हे पुढच्या पिढीस कागदावरच बघावेस मिळेल यावर शासनाने लवकरात लवकर उपाय योजना करने गरजेचे आहे.