
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
भारत सरकार मान्यताप्राप्त भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने इंदापुर येथील माधुरी भगवान चव्हाण यांची पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सचिव पदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री उत्तमरावजी पोवार दादा यांनी आज नियुक्ती पत्र काढून करण्यात आली आहे.या नियुक्ती ची घोषणा संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा श्री सचिन खैरमोडे यांनी केली.
ही निवड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा श्री गणेश कृष्णा भोसले व संगीता गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून करण्यात आली महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी व अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी या सामाजिक संघटनेमध्ये माझी निवड करण्यात आली आहे आणि ती मी प्रामाणिकपणे पूर्ण करीन व भ्रष्टाचाराला अन्याय आणि अत्याचाराला मोडीस काढण्यास मी या पदाची जबाबदारी स्वीकारते असे या वेळी नवनिर्वाचित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेच्या महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव माधुरीताई चव्हाण यांनी सांगितले.