
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
:जालन्यातील किर्ला गावात जनावरांचं लसीकरण करण्यात आलंय.सध्या देशभरात लम्पी आजारानं जनावरांमध्ये थैमान घातलंय.अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे लसीकरण करण्यात आलं.250 जनावरांवर सायपरकेअर औषधाची फवारणी करून लम्पी पासून जनावरांना दूर ठेवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली.मानवाधिकार सुरक्षा सेवा संघांचे राज्य अध्यक्ष अनिल खंदारे यांच्या पुढाकारातून किर्ला गावात लंपी रोग आटोक्यात आणण्यासाठी जनावरांचं शिबीर आणि फवारणी घेण्यात आली.सध्या राज्यभरात लम्पी आजारावरील लसीचा तुटवडा असून लम्पीची लागण झालेल्या गावापासून 5 किलोमीटरच्या आत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.जिथे जनावरांना बाधा झाली नाही तिथे लसीकरण केलं जाणार नाही असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.