
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सांगली जिल्ह्यांमध्ये काल झालेल्या मुलै पळवणारी टोळी समजून गैरसमजतीतून चौघा साधूंना बेदम मारहाण झाली. ही घटना सांगली जिल्ह्यांतील जत तालुक्यांतील समोर आली या घटनेनंतर उमेदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घडले असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षांत घेता यांमध्ये उमेदी पोलिसांनी सात आरोपींना अटकही केली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र चांगलाच वायरल झाला. यामध्ये राज्यांतील सर्व गोसावी समाज बांधवांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यांत आला. रशिया दौऱ्यांवर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षांत घेताच थेंट पोलीस महासंचालकांना घटनेचा विस्तार रिपोर्ट मागविला. तर एकीकडे राज्यांतील गोसावी समाज बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षकांच्या बदलीची मागणी थेंट उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मागील काही वर्षांमध्ये पालघर जिल्ह्यांमध्ये साधुसंतांना अशाच प्रकारे बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. पण या घटनेमध्ये तत्कालीन सरकारने पालघर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक डॉ. गौरव सिंग यांची तडकाफडकी बदली केली होती. मग तत्कालीन सरकारने हाच गोसावी समाजांला न्याय दिला का? पालघर घटनेचे गांभीर्य तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी जर लक्षांत घेतले असते तर सांगली जिल्ह्यांतील साधूंना झालेली बेदम मारहाण नक्कीच टळली असती ना? पण या घटनेची सांगली जिल्ह्यांत मात्र पुनरावृत्ती झाली या घटनेमुळे राज्यातील सर्व गोसावी समाज बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनद्वारे गोसावी समाजांतील साधु,संताना संन्याशांना तातडीने संरक्षण देण्यांची मागणी यावेळी राज्यभरांतील गोसावी समाज बांधवांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली.